नाशिक : प्रतिनिधी
शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी शासनाकडून ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली होती. त्यानुसार ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत शिधापत्रिकाधारकांना दिली होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील 38 लाख 68 हजार 269 नागिरकांचे ई-केवायसी करण्याचे पुरवठा विभागापुढे लक्ष्य होते. त्यांपैकी जिल्ह्यातील एकूण 30 लाख 87 हजार 740 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सात लाख 80 हजार 529 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. त्यामुळे आता या शिधापत्रकाधारकांचे धान्य बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ई-केवायसी एफडीओ नाशिकने पूर्ण केली असून, 13 टक्के ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. सर्वांत कमी ई-केवायसी कळवण तालुक्याची झाली आहे. 26.04 टक्के ई-केवायसी अपूर्ण आहे. त्यामुळे ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे अशांसाठी शासन पुन्हा मुदतवाढ देणार की, शिधापत्रिकेवर धान्य मिळणे बंद होणार, याचा अद्याप निर्णय झालेला नाही.
केवायसी प्रक्रिया पूर्ण व्हावी यादृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाकडून जाोरदार प्रयत्न सुरू होते. त्यानुसार ई-केवायसी प्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी असणार्या स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी दोन वेळा नोटीस
बजावली होती.
ई-केवायसी शासनाकडून बंधनकारक करण्यात आले होते.
त्यामुळे ज्यांची ई-केवायसी बाकी आहे, अशा शिधापत्रिधारकांबाबत
शासनाच्या निर्देशानुसार निर्णय घेण्यात येईल.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात नागरिकांना
अडचण येऊ नये म्हणून ‘मेरा रेशन’ हे अॅपही विकसित केले होते.
– कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी)
नाशिक जिल्ह्यातील तालुके
बाकी ई-केवायसी एफडीओ
मालेगाव – 77,167
कळवण – 43,191
सुरगाणा – 34,892
चांदवड – 43,280
इगतपुरी – 42,081
पेठ – 26,522
दिंडोरी – 55,210
बागलाण – 62,481
नांदगाव – 40,649
सिन्नर – 46,134
त्र्यंबकेश्वर – 24,565
नाशिक – 57,680
निफाड – 64,656
मालेगाव – 53,903
देवळा – 19,398
इंस्टाग्रामवरून ब्लॅकमेल; अल्पवयीन मुलीकडून लाखोंची वसुली - नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल सिडको विशेष…
सटाण्यात रंगल्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या सटाणा ः प्रतिनिधी स्वर्गीय माजी नगरसेवक दयाराम नाना सोनवणे यांच्या…
नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी पहलगाम (जम्मू-काश्मीर) घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकात दहशतवादी हल्ला…
पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक ः प्रतिनिधी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या आक्रमणाला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे देशभरात…
नांदगावच्या पोखरी जवळ भीषण अपघातात तीन ठार सहा गंभीर जखमी मनमाड : आमिन शेख :…
सुळेवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. 16) विजांचा कडकडाट,…