नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून गणेशोत्सवानिमित्त घरगुती पर्यावरणपूरक श्रीगणेश आरास स्पर्धेचे आयोजन केले आहे. नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव निर्माण करणे, हा यामागे प्रमुख उद्देश आहे. शाडू व अन्य पर्यावरणपूरक साहित्याचा मूर्तीसाठी वापर, प्रदूषणमुक्त विसर्जन व पर्यावरणपूरक सजावट करणार्यांनाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना आणि उपक्रम राबविण्यात येतात. प्रथम पारितोषिक दहा हजार, द्वितीय पाच हजार व तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये असेल.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या नागरिकांनी त्यांंच्या पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना, सजावट व घरीच केलेल्या विसर्जनाची छायाचित्रे महापालिकेने दिलेल्या ई-मेलवर अपलोड करावीत. त्यानंतर विभागीय अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल समितीकडे सादर
करतील.
समितीच्या पडताळणीनंतरच विजेत्यांची निवड केली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या नागरिकांनी शाडू किंवा इतर पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक सजावट व घरीच पर्यावरणपूरक पद्धतीने श्रींचे विसर्जन करणे आवश्यक आहे. तिन्ही निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या तीन स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, नदीचे प्रदूषण कमी करणे, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे आणि स्वच्छतेचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचवणे, हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
– अजित निकत, संचालक,
घनकचरा व्यवस्थापन विभाग, मनपा
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…