बेकरी प्रॉडक्ट जळून खाक; सिन्नर शहराजवळ बारागावपिंप्री रस्त्यावर घडली घटना
सिन्नर : प्रतिनिधी
मध्य प्रदेश येथून बेकरी प्रॉडक्ट घेऊन संगमनेरकडे जाणार्या आयशर टेम्पोला अचानक लागलेल्या आगीत 8 टन बेकरी प्रॉडक्ट आणि संपूर्ण टेम्पो जळून खाक झाल्याची घटना सिन्नर शहरातील बारागावपिंप्री रस्त्यावर घडली. बुधवारी (दि.2) सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत टेम्पोसह बेकरी प्रॉडक्ट जळून गेल्याने सुमारे 11 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन येथे खारी, टोस्ट हे सुमारे 8 टन 400 किलो वजनाचे बेकरी प्रॉडक्ट आयशर टेम्पो (एमएच – 18, बीजी – 6547) मध्ये भरून चालक सलमान खान सराफत खान (34) आणि क्लीनर अमाखान (32) हे दोघे मंगळवारी (दि.1) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास निघाले होते. बुधवारी (दि.2) सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास निफाड – सिन्नर रस्त्यावरून हा आयशर संगमनेरच्या दिशेने जात असताना अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला. चालक सलमान खान याच्या ही बाब लक्षात येताच त्याने तातडीने रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून बघितले असता, ताडपत्रीने पेट घेतला होता. जवळून जात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एक बसमधील महिलेने तातडीने अग्निशमन दलाला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सिन्नर नगरपालिका आणि माळेगाव एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सकाळी आठ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र, तोपर्यंत संपूर्ण टेम्पो आणि त्यातील 8 टन बेकरी प्रॉडक्ट जळून खाक झाले होते. सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे लाला वाल्मीकी, नवनाथ जोंधळे, सागर डावरे, आकाश देवकर यांच्यासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच हवालदार नवनाथ पवार, निवृत्ती गिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या संदर्भात अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ पवार करत आहेत.
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…