नाशिक

आयशर टेम्पो आगीत भस्मसात

बेकरी प्रॉडक्ट जळून खाक; सिन्नर शहराजवळ बारागावपिंप्री रस्त्यावर घडली घटना

सिन्नर : प्रतिनिधी
मध्य प्रदेश येथून बेकरी प्रॉडक्ट घेऊन संगमनेरकडे जाणार्‍या आयशर टेम्पोला अचानक लागलेल्या आगीत 8 टन बेकरी प्रॉडक्ट आणि संपूर्ण टेम्पो जळून खाक झाल्याची घटना सिन्नर शहरातील बारागावपिंप्री रस्त्यावर घडली. बुधवारी (दि.2) सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत टेम्पोसह बेकरी प्रॉडक्ट जळून गेल्याने सुमारे 11 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन येथे खारी, टोस्ट हे सुमारे 8 टन 400 किलो वजनाचे बेकरी प्रॉडक्ट आयशर टेम्पो (एमएच – 18, बीजी – 6547) मध्ये भरून चालक सलमान खान सराफत खान (34) आणि क्लीनर अमाखान (32) हे दोघे मंगळवारी (दि.1) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास निघाले होते. बुधवारी (दि.2) सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास निफाड – सिन्नर रस्त्यावरून हा आयशर संगमनेरच्या दिशेने जात असताना अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला. चालक सलमान खान याच्या ही बाब लक्षात येताच त्याने तातडीने रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून बघितले असता, ताडपत्रीने पेट घेतला होता. जवळून जात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एक बसमधील महिलेने तातडीने अग्निशमन दलाला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सिन्नर नगरपालिका आणि माळेगाव एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सकाळी आठ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र, तोपर्यंत संपूर्ण टेम्पो आणि त्यातील 8 टन बेकरी प्रॉडक्ट जळून खाक झाले होते. सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे लाला वाल्मीकी, नवनाथ जोंधळे, सागर डावरे, आकाश देवकर यांच्यासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच हवालदार नवनाथ पवार, निवृत्ती गिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या संदर्भात अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ पवार करत आहेत.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago