नाशिकरोड : वार्ताहर
नाशिकरोडला जुलूस काढून मुस्लिम बांधवांनी ईद-ए- मिलादुन्नबी साजरी केली. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या इस्लाम धर्म स्थापनेला 1500 वर्षे (हिजरी) पूर्ण झाली. यामुळे मुस्लिम बांधवांत यावेळी नवचैतन्य दिसून आले. नाशिकरोडमध्ये पारंपरिक पद्धतीने गोसावीवाडी येथून या जुलूसचा प्रारंभ झाला. प्रारंभी नाशिकरोड परिसरातील सर्व मशिदींचे मौलाना मंचावर विराजमान झाले. मौलानांनी हजरत मोहम्मद पैगंबरांचे विचार सर्वांसमोर मांडले.
यावेळी नियाजवर फात्याह देऊन जुलूसची सुरुवात करण्यात आली. बग्गीमध्ये नाशिकरोडच्या सर्व मौलानांना बसवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जुलूसचा प्रारंभ झाला. हा जुलूस डॉ. आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिटको चौक, महात्मा गांधी रोडमार्गे विहितगाव आणि पुन्हा मागे येऊन देवळालीगावातील मैदानावर याचा उत्साहात समारोप करण्यात आला. पोलिस स्टेशनसमोर कन्नू ताजने, नय्यूम खान यांच्या सहकार्यांनी मिरवणुकीचे स्वागत करून मौलानांचा सत्कार केला. अनुराधा चौकात सूर्यकांत लवटे, राजू लवटे, राजू शेख, जमील पठाण यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. हॉटेल नवनाथ ग्रुपतर्फेही अंबादास गवळी, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, दिलीप भोसले, अय्यास शेख, दत्तात्रय ढिकले, दत्तात्रय वाजे, रविकिरण घोलप, चैतन्य देशमुख, मंगेश लांडगे, ताहीर शेख, रितेश केदारे, सुभाष जाचक आदींनी या जुलूसमधील मुस्लिम बांधवांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. नाशिकरोड ब्लॉक काँग्रेसतर्फे कामील इनामदार, दिनेश निकाळे, अल्ताफ सय्यद, रईस शेख, तौफिक शेख आदींनी या जुलूसमधील मुस्लिम बांधवांचे स्वागत केले.
या जुलूसमध्ये वसीम शेख, राम रहीम मित्रमंडळाचे अरुण गिरजे, रहेबर सोशल ग्रुपचे अंनिस खान, रिजवान बाटलीवाला, नूर सय्यद, अहमद फक्रुदीन सय्यद हेही सहभागी झाले होते. सत्कार पॉइंटवर हनफिया फाउंडेशनतर्फे मुन्ना अन्सारी यांनी गजानन शेलार, अशोक पाटील मोगल, प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे, सचिन आहेर, भाईजान बाटलीवाला, अविनाश शिंदे, लक्ष्मण मंडाले, राजाभाऊ जाधव, संतोष गाडेकर, गणेश मोरे, नयना घोलप आदींनी जुलूसमधील प्रत्येक मंडळाचे प्रमुखांना सन्मानित केले. अल्ताफ सय्यद, भाईजान बाटलीवाला, आसिफ शेख यांनी सूत्रसंचालन केले. मुस्लिम बांधव उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते. विहितगावात विक्रम कोठुळे व त्यांच्या सहकार्यांनी या जुलूसचे स्वागत केले. या जुलूसचा देवळाली गावातील मनपा मैदानात समारोप करण्यात आला.
यावेळी मौलाना हारून रशीद मिसाबाही, मौ. हजरत हाफिज बारी, मौलाना मुश्ताक, मौलाना अरबाज शेख, मौलाना अफसर शेख, मौ. आझाद नक्षबंदी, मौ. मेहमूद आलम, मौ. गुलजार अहमद, मौ. जफर खान, मौ. शाकीर आलम, मौ. रजा आदी मौलवींनी धार्मिक विषयावर प्रवचन केले. हा जुलूस यशस्वी करण्यासाठी निजाम मास्टर, हाजी इम्तियाज सय्यद, इम्तियाजमामू शेख, अन्वर हैदरअली, अल्ताफ सय्यद, रईस शेख, गजमफर खान, तौफिक खान, इम्रान खान, हमीद दादा, असलम मणियार, आसिफ बबलू शेख, मोसिन पटेल, एजाज शेख आदींनी परिश्रम घेतले.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…