केंद्रीय मंत्री खट्टर यांना आ. आहिरेंचे साकडे; मुख्यमंत्री फडणवीस यांचेही वेधले लक्ष
नाशिक : प्रतिनिधी
देवळाली विधानसभा मतदारसंघातील शिलापूर येथे प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेची ऊर्जा विभागांतर्गत स्थापना होत आहे. या प्रकल्पाच्या स्थापनेसाठी शेतकर्यांच्या जमिनींचे संपादन करण्यात आले. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाल्याने शासनाने या शेतकर्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार सरोज आहिरे यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही भूमिहीन तरुणांना रोजगार देण्याची मागणी केली.
शिलापूर (ता. नाशिक) येथे बुधवारी (दि. 10) केंद्रीय मंत्री खट्टर यांच्या हस्ते इलेक्ट्रिक टेस्टिंग हबचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती.
दरम्यान, देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहिरे यांनी केंद्रीय मंत्री खट्टर यांची भेट घेतली असता, त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, या प्रयोगशाळेच्या उभारणीकरिता शिलापूरमधील शेतकर्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. शेतकर्यांनी जमीन संपादनास विरोध केला असता तर प्रकल्पास अडचणी आल्या असत्या. मात्र, शेतकर्यांनी शासनाच्या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद देत जमिनीचे संपादन करण्यास कुठलाही विरोध केला नाही. त्यामुळेच ही प्रयोगशाळा निर्माण होत आहे. पण आजवर वर्षानुवर्षे ज्या शेतीवर शेतकरी बांधव उदरनिर्वाह करत होते, ती शेती गेल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला विनंती आहे की, शासनाने अधिग्रहण केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबातील सदस्याला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी उपलब्ध करून द्यावी, असे साकडे आ. आहिरे यानी मंत्री खट्टर यांना घातले. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निवेदन देऊन या प्रयोगशाळेकरिता मोठ्या प्रमाणात स्थानिक शेतकरी वर्गाचे भूसंपादन झालेले आहे. परिणामी, येथील शेतकरी भूमिहीन झाले आहेत. तरी या गोरगरीब शेतकर्यांच्या कुटुंबातील तरुणांना प्रयोगशाळेत नोकरी देण्याकरिता संबंधित अधिकार्यांना आदेश देण्याची मागणी केली.
माझ्या मतदारसंघातील शिलापूर येथे प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेकरिता शेतकर्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. त्यामुळे शेतकरी भूमिहीन झाले. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. तरी शासनाने यात लक्ष घालून अधिग्रहण झालेल्या शेतकर्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला प्रयोगशाळेत नोकरी देऊन त्यांचा प्रश्न सोडवावा.
– आ. सरोज आहिरे, देवळाली मतदारसंघ
1,245 कोटींपैकी अवघी 191 कोटींची वसुली पाच महिन्यांत वसुलीचे आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील घरपट्टी…
उपमुख्यमंत्री शिंदे : गंगापूर समांतर मार्गाचे भूमिपूजन नाशिक : प्रतिनिधीं नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील वाढती…
तीन आठवड्यांत संख्या 109 वर नाशिक : प्रतिनिधी शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतच असून, ऑक्टोंबरच्या तीन…
शहा येथे मध्यरात्री चोरी; 73 हजारांचा मुद्देमाल लंपास सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा येथे मध्यरात्री…
नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून हैदराबादसाठी सुरू असलेल्या विमानसेवेसाठी 78 ऐवजी 180 आसनी विमान…
प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा सिडको : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील फुलेनगर परिसरात…