लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी
सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल एकाच वेळी आठ जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील सहा लोकसेवक आणि दोन खाजगी इसमांचा समावेश आहे. दहेगाव पाटोदा (ता. येवला) सागाची झाडे तोडण्यासाठी वन विभागाकडे परवानगी मागितली होती. परवानगी मिळवून देण्यासाठी आरोपींनी 19 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी (19 मे) एसीबीच्या पथकाने येवला हद्दीत सापळा रचला. मुख्य आरोपी वनपाल भाऊसाहेब माळी याच्यासाठी वनरक्षक पंकज नागपुरे याने 5,000 रुपये स्वीकारले. उर्वरित आरोपी कनिष्ठ लिपिक प्रवीण भोसले, वनरक्षक आकाश कोळी, वनमजूर विजय लोंढे, रामनाथ भोरकडे आणि निखिल आरणे व सुनील भुरुक यांनीही लाचेचा हिस्सा स्वीकारला.

Eight people caught red-handed while accepting bribe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *