हे सर्व सामन्याचे सरकार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक : वार्ताहर
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचार व स्वर्गीय आनंद दिघेचे आदर्श पुढे नेत आहेत. शिवसेना भाजप चे हे एकत्रित सर्व सामन्याचे सरकार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शुक्रवारी (दि २९) पाथर्डीफाटा परिसरात रात्री उशीरा आगमन झाल्यानंतर स्वागत स्विकारताना केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असे स्वराज स्थापन करुन सर्वांगीण विकास सर्व सामान्य चे सरकार आहे. सर्व सामान्यांच्य जीवनात आमूलाग्र बदल घडवायचा आहे. राज्याचा सर्वांगीण विकास ध्येय सरकारचे असणार आहे. पंढरपूर चा विकास तीरूपती बालाजी प्रमाणे होणार आहे. तर नाशिक त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्र विकास कुंभमेळा घ्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे प्रथमच नाशिक जिल्हा दौऱ्यावर आल्याने शुक्रवारी (दि २९) रात्री साडे अकरा वाजता शहराचे प्रवेश द्वार असलेल्या पाथर्डी फाटा परिसरात खासदार हेमंत गोडसेच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय कक्षाचे उत्तर महाराष्ट्र समनव्यक योगेश म्हस्के यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. क्रेन व्दारे गुलाब पुष्पाचा हार मुख्यमंत्री शिंदे यांना घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास क्रेन द्वारे पुष्पहार अर्पण करत पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल ताशाव फटाक्यांच्या आतिषबाजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे हजारो समर्थकाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सुजित जीरापुरे , जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे, किरण वाघ , अजिंक्य गोडसे, शिवम पाटील, मामा ठाकरे आदी च्या वतीने स्वागत करण्यात आले,
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…