शनिवार, ३० जुलै २०२२.

श्रावण, शुक्ल द्वितीया. दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस. ‘व्यतिपात’ योग. दर शनिवारी नरसिंह – पिंपळ – शनी- मारुती पूजन करावे.

चंद्र नक्षत्र -आश्लेषा (दुपारी १२.१३ पर्यंत)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महत्वाची कामे दुपारनंतर पूर्ण करा. भागीदारी व्यवसायात अपयश येऊ शकते. चोरीचे भय आहे.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम आर्थिक लाभ होतील. प्रवासातून नवीन ओळखी होतील. मात्र परतावा मिळण्यास वाट बघावी लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रसन्न वाटेल. उत्तम लाभ होतील. वक्तृत्व कामास येईल. कलाकारांना उत्तम दिवस.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल. मौज कराल. आत्मविश्वस वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विनाकारण भ्रमंती होईल. महत्वाची कामे दुपार नंतर करा. आरोग्य सांभाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. तरीही लाभ होतील. सकाळच्या वेळात कामे पूर्ण करा.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम लाभाचा दिवस आहे. वरिष्ठ खुश होतील. शब्दास वजन प्राप्त होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गूढ विद्यांचे आकर्षण वाटेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक कामास येईल.

धनु:- (ये, यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) सकाळ आळसात जाईल. जेष्ठांशी संवाद होईल. दुपारी उत्साह वाढेल. काटकसर करावी लागेलं.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. वाहने जपून चालवा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पूर्वार्धात आर्थिक लाभ होतील. महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. दुपारनंतर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र उत्तम दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. पराक्रम गाजवाल.,

व्यवसाय आणि इतर मार्गदर्श ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago