मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
कळवण : प्रतिनिधी
येथील रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढला असून, दोन गायींच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला. भालचंद्र रघुनाथ मालपुरे असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कळवण शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वृद्धाला जीव गमवावा लागला. कळवण शहरातील जुना ओतूररोडवरील कळवण मर्चंट्स बँकेजवळील श्री सायबर कॅफेसमोर मोकाट जनावरांपैकी दोन गायी एकमेकींना धडकत होत्या.
यावेळी भालचंद्र रघुनाथ मालपुरे (वय 85, रा. छत्रपती शिवाजीनगर, कळवण) हे रस्त्याने जात होते. या गायींनी मालपुरे यांना शिंगावर उचलून रस्त्यावर आपटले. त्यात त्यांना गंभीर दुखापत
झाली.
मालपुरे यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मालपुरे यांचा मृत्यू झाला. याबाबत कळवण पोलिस ठाण्यात योगेश रत्नाकर मालपुरे यांच्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी भेट दिली. हवालदार तिडके तपास करत आहेत.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…