सिडको : विशेष प्रतिनिधी
देवळाली कॅम्प परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलेला गंडा घालत सुमारे 5 लाख 20 हजार रुपयांच्या डायमंड जडित सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी श्रीमती प्रफुल्ला रोहित कामदार (वय 66, रा. सायन पश्चिम, मुंबई) या आपल्या मैत्रीण रश्मी शाह यांच्यासोबत जालावाडी सॅनिटोरियम येथून अजमेरा हॉटेलकडून लॅमरोडकडे जात असताना देवळाली कॅम्प येथील वैभव सोसायटीसमोर ही घटना घडली.
त्यावेळी तिघा अनोळखी इसमांनी त्यांना अडवून आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी केली. परिसरात एका महिलेवर चाकूने हल्ला करून तिचे दागिने लुटल्याचे सांगत त्यांनी फिर्यादींना दागिने काढण्यास सांगितले. फिर्यादींनी नकार दिल्यानंतर त्यांच्या चौथ्या साथीदाराने स्वतःच्या गळ्यातील चैन काढून दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींनी सुमारे 2 लाख 80 हजार रुपये किमतीच्या हातातील अंदाजे 7 तोळे वजनाच्या दोन डायमंड जडित बांगड्या, तसेच 2 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 6 तोळे वजनाचे दोन डायमंड जडित बांगड्या काढून दिल्या. सदर इसमांनी बांगड्या पांढर्या कागदात गुंडाळून रश्मी शाह यांच्या पर्समध्ये ठेवल्याचे भासविले. मात्र, संगनमताने त्यांनी बांगड्या
स्वतःकडेच ठेवून मोटारसायकलवरून पसार होत फिर्यादींची फसवणूक केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…