इलेक्ट्रिक दुचाकीला आग ; आठ वाहने जळून खाक

इंदिरानगर : वार्ताहर

पाथर्डी फाटा परिसरातील
प्रशांत नगर येथील इमारतीच्या तळमजल्यावर इलेक्ट्रिक दुचाकीला रात्रीच्या सुमारास आग लागली. जवळच असलेल्या इतर वाहनाने पेट घेऊन यात आठ वाहने जळून  खाक झाले. दरम्यान ज्या इलेक्ट्रिक बाईकला आग लागली ती बाईक  तीन दिवसापासून पार्किंगमध्ये उभी होती. रात्रीची वेळ असतानासुद्धा आग कशामुळे लागली याविषयीचा तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहे.
प्रशांत नगर येथे असलेल्या सर्वे नंबर 297 मधील मल्हार बिल्डिंगच्या तळमजल्यावर उभ्या होत्या. रात्री साधारण दीड वाजेच्या सुमारास येथे आग लागल्याचे रस्त्यावरून जात असलेल्या काही युवकांच्या लक्षात आले. त्यांनी अग्निशमन दल व पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. रहिवाशांना ही बाब लक्षात येताच त्यांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला परंतु आगीच्या व धूराचे प्रचंड लोट होते. कसेबसे ते खाली आले. त्यांनी पाण्याच्या टाकी मधून पाणी काढून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. तोपर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ही आग विझवली. इंदिरानगर पोलीस स्टेशनचे सपोनि निसार सय्यद तसेच पोलीस कॉन्स्टेबल शेख, दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यात दोन लाख साठ हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *