जानेवारीत सिटीलिंकच्या ताफ्यात येणार 50 ई-बसेस
नाशिक ः प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून नाशिक महापालिकेला पीएम ई-बस योजनेंतर्गत शंंभर इलेक्ट्रिक बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पन्नास ई-बसेस नाशिकला मिळणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया काही महिन्यांपासून महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून सुरू होती. वीजजोडणीचे काम अंतिम टप्प्यात आल्याने इलेक्ट्रिक बसचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या जानेवारीत पन्नास ई-बसेस सिटीलिंकच्या ताफ्यात दाखल
होणार आहेत.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील विविध शहरांत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार नाशिकला पन्नास बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या ताफ्यात दोनशे सीएनजी व पन्नास डिझेल बसेस आहेत. मात्र, यातील पन्नास डिझेल बसेस थांबविण्याच्या विचारात प्रशासन होते. त्या बसेसही सुरूच असणार आहेत. केंद्र शासनाने पीएमई बस योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे. नाशिक मनपाला पहिल्या टप्प्यात पन्नास बसेस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. महापालिकेने आडगाव येथे शंभर बसेससाठी डेपो उभारला आहे. यासाठी 27 कोटींचा खर्च असून, एनकॅप निधीतून हा खर्च करण्यात आला आहे.
प्रतिकिलोमीटर 71 रुपयांचा खर्च
इलेक्ट्रिक बससाठी प्रतिकिलोमीटर 71 रुपये खर्च येणार असून, त्यांपैकी 24 रुपये अनुदान केंद्र देईल. उर्वरित 47 रुपये खर्च महापालिकेला द्यावा लागेल. इलेक्ट्रिक बससाठीचे वाहक सिटीलिंक चालकांनुसारच असतील, तर चालक कंपनीचे असणार आहेत.
सिंहस्थापर्यंत शंभर ई-बसेस
सिंहस्थ कुंभमेळा दोन वर्षांवर आला असून, अशा वेळी सिटीलिंकच्या ताफ्यात शंभर इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे या बसेसचा फायदा सिंहस्थात मोठ्या प्रमाणात होईल. सिंहस्थापूर्वी पहिल्या टप्प्यात पन्नास व दुसर्या टप्प्यात पन्नास अशा शंभर बसेस उपलब्ध होणार आहेत.
कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…