नाशिक

टँकरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

सून, दोन वर्षांची नात गंभीर जखमी

सिन्नर : प्रतिनिधी
रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामावर पाणी मारणार्‍या टँकरच्या चाकाखाली सापडून 52 वर्षीय दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पांगरी ते मर्‍हळ रस्त्यावर मर्‍हळ बुद्रुक शिवारात घडली. बुधवारी (दि.20) दुपारी 3 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात मृताची 25 वर्षीय सून व दोन वर्षांची नातही गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, टँकरचालकाने मद्य सेवन केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
चिंधू उर्फ हरिभाऊ सुखदेव कुर्‍हे (52, रा. मर्‍हळ बुद्रुक) असे मयताचे नाव आहे. तर त्यांची सून कल्याणी ऋषिकेश कुर्‍हे (25) व नात स्वाती (2) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. सुनेला आणि नातीला दुचाकीवर घेऊन सोमठाणे येथे माहेरी सोडविण्यासाठी हरिभाऊ कुर्‍हे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. मर्‍हळ – पांगरी रस्ता काँक्रिटीकरणाचा एक पदर पूर्ण झाला आहे.
तर दुसर्‍या बाजूला पावसामुळे पूर्ण चिखल होता. त्यामुळे दुचाकी काँक्रीटच्या पदरावरून जात होती तर याच कामावर पाणी मारण्यासाठी असलेला खासगी ठेकेदाराचा टँकर (एमएच 15, बीजे 4513) हा मागे येत असताना पांगरी बाजूकडून मर्‍हळच्या दिशेने जाणार्‍या दुचाकीला टँकरचा धक्का लागला. समृद्धी महामार्गाच्या अंडरपासपासून काही अंतरावर अर्जुन कुटे यांच्या बंगल्याजवळ हा अपघात झाला. टँकरचा धक्का लागून दुचाकी घसरली. दुचाकीचालक चिंधू उर्फ हरिभाऊ सुखदेव कुर्‍हे (52, रा. मर्‍हळ बुद्रुक) हे टँकरच्या चाकाखाली सापडले. तर सोबत असलेली त्यांची सून कल्याणी ऋषिकेश कुर्‍हे (25), नात स्वाती (2) यादेखील काँक्रीट रस्त्यावर फेकल्या गेल्या. कल्याणी यांच्या कमरेला मार लागून तर नात स्वाती ही डोक्यावर आपटून दोघीही गंभीर जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर बाजूच्या शेतामध्ये काम करणारे शेतकरी मदतीला धावले. त्यांनी टँकरचालकाला थांबवून ठेवले. पांगरी येथून खासगी रुग्णवाहिका बोलावून तिघांनाही उपचारासाठी सिन्नरला नेण्यात आले. मात्र, सिन्नरला पोहोचण्यापूर्वीच हरिभाऊ कुर्‍हे यांचा मृत्यू झाला.
सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून हरिभाऊ कुर्‍हे यांचा मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस नाईक अमोल गोडे यांनी अपघातस्थळी तसेच सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago