सातपूर : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका सातपूर विभागीय कार्यालय हद्दीतील राष्ट्रीय मुक्त फेरीवाला (हॉकर्स )झोन क्र 3 मध्ये आज सकाळी मनपाच्या वतीने वाढीव अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. लॉकडाऊननंतर सातपूर एमआयडीसीच्या जागेत फेरी विक्रेत्यांसाठी मनपाच्या वतीने होकर्स झोन तयार करण्यात आला.व्हिक्टर गॅसकेट कंपनी भिंतीलगत असलेल्या फेरीवाला झोनमध्ये नियमानुसार 20 व्यवसायिकांसाठी पाच बाय पाच ची जागा आहे.परंतु काही दिवसांपासून येथे अनेक वाढीव अतिक्रमण झालेले दिसून येत होते. या अनुषंगानेच आज सातपूर मनपाच्या विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत वाढीव केलेल्या अतिक्रमणावर जेसीबी फिरवण्यात आला. ही कारवाई नाशिक मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील तसेच सातपूर विभागीय अधिकारी सुनिता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली संजय चौधरी, राजेंद्र भोरकडे, मधुकर गायकवाड, भरत खैरनार, तानाजी निगळ, संजय कोठुळे, भगवान सूर्यवंशी, जीवन ठाकरे, विलास काळे, शुभम काळे तसेच पाच अतिक्रमण वाहने, एक जेसीबी, पंचावन मनपा कर्मचारी आणि दहा पोलीस यांच्या मोहिमेत करण्यात आली.
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…