सिन्नर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील लाचखोर अभियंत्यास दीड लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडत अटक केली. अमोल खंडेराव घुगे (43) असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.
तालुक्यातील पाथरे ता. सिन्नर जि. नाशिक येथे नळ पाणी पुरवठ्याचे काम जिल्हा परिषदेचे शासकीय स्थापत्य कंत्राटदाराने नियमानुसार पूर्ण केले. या कामाचे 48 लाख रुपये देयक बिल तयार करून मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग शाखा अभियंता अमोल खंडेराव घुगे याने 4 टक्के रक्कम 1 लाख 90 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती सदर रक्कम 3 टक्के 1 लाख 50 हजार रुपये लाचेची रक्कम त्याच्या कार्यालयात स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे,वाचक पोलीस उप अधीक्षक, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी उपअधीक्षक अभिषेक पाटील,हवालदार सुकदेव मुरकुटे, मनोज पाटील यांनी यशस्वीरित्या राबविली.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…