नाशिक

तहानेच्या बहाण्याने घरात घुसून सोनपोत लांबवली

महिला मजुराविरोधात गुन्हा दाखल

निफाड : तालुका प्रतिनिधी
शेतीकाम करताना लागलेल्या तहानेचा गैरफायदा घेत एका महिला शेतमजुराने चक्क मालकिणीच्या घरातून सोन्याच्या पोतवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे घडली आहे. पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरून कपाटातील 1 तोळा 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणार्‍या संशयित महिला मजुराविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेंडाळी येथील धोंडाईचा मळा शिवारात संगीता भागवत खालकर (वय 48) यांचे शेत आणि शेतातच घर आहे. 30 जून रोजी दुपारी नेहमीप्रमाणे शेतात काम सुरू होते. यावेळी औरंगपूर येथे राहणारी एक महिला मजूर तिथे काम करत होती.
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रचंड उकाड्यामुळे या संशयित महिला मजुराने संगीता खालकर यांना पाणी पिण्यासाठी घरात जात असल्याचे सांगितले. परंतु, घरात गेल्यानंतर पाण्याचा तांब्या घेण्याऐवजी या महिलेची नजर घरातील लाकडी कपाटावर पडली. तिने कपाट उघडून त्यातील 59,800 रुपये किमतीची सोन्याची पोत (मंगळसूत्र), ज्यामध्ये 124 गोलाकार मणी आणि दोन सोन्याच्या वाट्या होत्या, ती चोरून पोबारा केला.

पाच दिवसांनी चोरी उघड

चोरीचा हा प्रकार तब्बल पाच दिवसांनी लक्षात आला. यानंतर 5 जुलै रोजी रात्री सायखेडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली. सायखेडा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अहिरे करत आहेत. विश्वासू मजुरानेच अशा प्रकारे हात साफ केल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

Entered the house under the pretext of thirst and made off with a gold necklace.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago