खंडणीखोरांमुळे उद्योजक हैराण; पोलीस यंत्रणेचे झाले दुर्लक्ष

कायद्याच्या बालेकिल्ल्यात स्क्रॅप माफियांची दहशत

सिडको : दिलीपराज सोनार
अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीमालक आणि उद्योजक अनेक वर्षांपासून माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून खंडणी मागणार्‍या टोळ्यांमुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे औद्योगिक वसाहतीतील व्यावसायिक वातावरण भयमय झाले होते. तथापि, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी औद्योगिक वसाहतीतील निमा, तसेच आयमाच्या पदाधिकार्‍यांशी नियमित संवाद साधून उद्योजक व कामगारांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते.

याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील खंडणीखोर संतोष शर्मा आणि त्याच्या टोळीवर कारवाई करत त्यांना अटक केली. संतोष शर्मा आणि त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळल्याने उद्योजकांना काही प्रमाणात सुरक्षा मिळाली आहे. मात्र, औद्योगिक वसाहतीत स्क्रॅप माफियांचा त्रास अजूनही सुरू असल्याने उद्योजकांनी या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरदार केली आहे.
अंबड तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योग मालकांच्या तक्रारींनुसार, या टोळ्यांमध्ये काही सत्ताधारी पक्षांसह इतर राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सामील आहेत. त्यामुळे अनेक उद्योजक पुढे येत नाहीत, तर माफियांचा गैरवर्तन दिवसेंदिवस वाढत आहे. अंबड आणि सातपुर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये स्क्रॅप उचलण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्यांचा सक्रिय सहभाग असल्याचेही निदर्शनास आले आहे. नाशिक शहर पोलिसांनी याआधी लोंढे गँग, बागूल गँगसह अनेक टोळ्यांवर कारवाई करून शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अनेक गुन्हेगारांना ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ दाखवून शहरातील गुन्हेगारीवर प्रभुत्व दाखवले. तथापि, औद्योगिक वसाहतीतील स्क्रॅप माफियांचा त्रास अद्याप कायम असून, उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या मते, संतोष शर्मा टोळ्याप्रमाणेच बाकीच्या स्क्रॅप माफियांविरोधातही पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी. यामुळे उद्योजकांना भयमुक्त वातावरण मिळेल आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यवसाय सुरळीत चालू राहील. सध्याच्या परिस्थितीत, जर स्क्रॅपमाफिया नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत सहभागी झाले, तर त्यांच्या गुंडगिरीची शक्यता वाढण्याची भीती आहे. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या मालकांमध्ये एकमत असून, पोलिसांनी या माफियांचा वेळेत बंदोबस्त करावा, ही त्यांची अपेक्षा आहे. पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी कठोर पावले उचलल्यास औद्योगिक वसाहतीत व्यवसायिक वातावरण सुरक्षित होईल व उद्योजकांना भविष्यातील गुन्हेगारीपासून संरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, कामगार व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय साधून औद्योगिक क्षेत्रातील शांतता कायम ठेवणे अत्यावश्यक ठरले आहे.

स्क्रॅपमाफियांची दादागिरी पोलिसांच्या नजरेतून सुटली कशी?

नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढताना अनेक गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई करुन त्यांच्या विरोधात मकोकाअंतर्गत कारवाई केली. अनेकांना ’नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’देखील दाखवला आहे. शहरभर ही सर्व कारवाई चालत असताना अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील स्क्रॅपमाफियांची दादागिरी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्क्रॅपमाफियांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतील कंपन्यांमधील स्क्रॅप उचलण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्यांचा सहभाग आहे. याच टोळ्यांमध्ये काही सत्ताधारी पक्षांसह राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. हेच पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जर हे स्क्रॅपमाफिया महापालिका निवडणुकीत निवडून आले तर आगामी काळात या स्क्रॅपमाफियांची गुंडशाही अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औद्योगिक वसाहतीत अशांतता निर्माण करणार्‍या स्क्रॅपमाफियांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *