नाशिक: प्रतिनिधी
शहरात गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही. गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून आज सकाळी टोळक्याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. गंगापूर रोड ते पंडित कॉलनी या रस्त्यावर आकाश धनवटे हा जात असताना अथर्व दाते याने त्याच्या चार ते पाच साथीदारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस हल्लेखोर यांचा शोध घेत आहे.