आ. कोकाटेंच्या प्रयत्नातून घोटेवाडीत व्यायामशाळेचे लोकार्पण
सिन्नर : प्रतिनिधी
पोलीस व लष्करी भरतीची तयारी करणार्या तरुण-तरुणींसह गावातील युवकांना व्यायामासाठी सुविधा मिळावी, यासाठी घोटेवाडी येथे सुसज्ज व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून आणि जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या व्यायामशाळेची इमारत व साहित्याचे शनिवारी (दि.15) स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले.
ग्रामपंचायत प्रशासक तथा सरपंच मंजुश्री घोटेकर, उपसरपंच रंजना घोटेकर आणि सदस्य विलास यादव, जयश्री नानासाहेब यादव यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा झाला.
घोटेवाडीतील युवक-युवती तसेच पोलीस आणि लष्करी भरतीची तयारी करणार्या तरुणांना व्यायामासाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सरपंच घोटेकर व उपसरपंच घोटेकर यांनी आमदार कोकाटे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत 7.5 लाख रुपयांची व्यायामशाळेची इमारत आणि 7.5 लाखांचे आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. गावातच व्यायामशाळेची सुविधा उपलब्ध झाल्याने युवक-युवतींची होणारी गैरसोय दूर झाली आहे. पोलीस व लष्करी भरतीची तयारी करणार्या तरुणांना नियमित सरावासाठी या सुविधेचा मोठा फायदा होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घोटेकर व सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी घोटेकर यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान घोटेकर, बापूसाहेब घोटेकर, कृष्णाजी घोटेकर, शिवाजी घोटेकर, रामनाथ घोटेकर, पोलीसपाटील आवडीराम लोखंडे, अॅड. प्रवीण घेगडमल, साहेबराव घोटेकर, पोपटराव घोटेकर, सुरेश घोटेकर, शंकेश ढमाले, समाधान यादव, समाधान घोटेकर, आकाश सरोदे, अनिल खामकर, ओमकार कांदळकर, एकनाथ घोटेकर, सुखदेव वैराळ, एकनाथ वैराळ, संतोष घोटेकर, महिला बचत गटाच्या समन्वयक आरती घोटेकर, शीतल घोटेकर, भागीनाथ खामकर, गोपीनाथ खामकर, केशव घोटेकर, कर्मचारी विलास गुंजाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सुविधेचा योग्य वापर करण्याचे आवाहन
गावातील तरुण-तरुणींनी व्यायामशाळेतील साहित्याचा योग्य वापर करून आरोग्य सुदृढ ठेवावे. तसेच पोलीस व लष्करी भरतीची तयारी करणार्या युवकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच मंजुश्री घोटेकर यांनी केले.
Exercise facilities for recruitment-bound youth right in the village.
तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…
सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…