सिडको : विशेष प्रतिनिधी
मुंबई येथील सीबीआय अधिकारी असल्याचेे भासवून एका नागरिकाच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे. त्याच्या बँक खात्यांवर गुन्हे दाखल झाल्याचे सांगून त्याच्याकडून 47 लाख 87 हजार 500 रुपयांची रक्कम खंडणी म्हणून उकळण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधत, ते सीबीआय मुंबईमधील अधिकारी मोहनदास असल्याचे भासवले.आरोपींनी बनावट सीबीआय लोगो असलेले पत्र पाठवून त्यात फिर्यादीचे नाव व आधार क्रमांक वापरून, त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज ट्रॅफिकिंग व हवाला व्यवहारांचे आरोप लावले. तसेच त्यांच्या आधारकार्डचा वापर करून विविध राज्यांत बँक खाती उघडली गेल्याचे सांगण्यात आले.
खोट्या चौकशीच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादीला मानसिक दबाव आणत, त्यांच्या बँक खात्यांतील रक्कम एका विशिष्ट खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले. फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबीयांना धोका असल्याचे सांगून त्यांना भीती दाखवण्यात आली. एकूण 47 लाख 87 हजार 500 रुपयांची रक्कम उकळण्यात आली.
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…