मुंबई : एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्याचा मास्टर स्ट्रोक भाजपाने मारल्यानंतर प्रारंभी मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, त्यानंतर काही तासातच केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतील, असे ट्विट गृहमंत्री अमित शाहा यांनी केले. तत्पूर्वी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही फडणवीस हे मंत्रीमंडळात असतील, असे सांगितले होते. मात्र, फडणवीस यांनी प्रारंभी नकार दिल्यानंतर अमित शाह यांच्या ट्विटनंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्यास संमती दिली आहे.