दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त
तिघांना अटक
दिंडोरी : प्रतिनिधी
शहरातील आश्रय लॉज च्या एका रुम मधुन बनावट नोटा प्रिंटर व मोबाईल असा एकुण 20, 744 रुपयांचा ऐवज जप्त करुन तीन संशयीतांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांनी दिलेली माहीती अशी , दिंडोरी शहरातील आश्रय लाॕजमधील रुम नंबर 203 मधे बनावट नोटा तयार होत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिह परदेशी यांनी धाड टाकुन ए फोर पेपर, प्रिंटर, बनावट चलनी नोटा असा एकुण 20,744 रुपयांचा ऐवज जप्त केला असून किरण दशरथ माळेकर, ज्ञानेश्वर सदु गायकवाड व अनिल बाळु माळेकर यांना अटक करण्यात आली आहे, याबाबत सदर संशयीत यांनी यापुर्वी बनावट नोटा चालनात आणल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात असुन सदर टोळीची सखोल माहीती व पार्श्वभूमी पोलिस तपासुन पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *