चक्क साडेतीन एकर बागेवरच केले आच्छादन
लासलगाव:-समीर पठाण
वाढत्या उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे निफाड तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह इतर फळ बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे,रुई,धारणगांव खडक,कोळगांव,बोकडदरे परिसरातील शेतकरी पूर्वीपासून फळबागायतदार आहेत तसेच या परिसरामध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणावर आहे.या परिसरात गोदावरी नदीचे पात्र तसेच डावा कालवा,पालखेड कालवा जात असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीसह फळबागा लावलेल्या आहेत.
सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या उन्हाचा देखील मोठा फटका बसत आहे.वाढत्या उन्हापासून बागा संरक्षित करण्यासाठी खेडलेझुंगे,धारणगांव खडक, सारोळे थडी परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने बागेवर अच्छादन केले आहे.त्यामुळे वाढत्या उन्हापासून डाळिंबाचे फळ वाचविण्यास मदत होणार आहे
खेडलेझुंगे (ता.निफाड) येथील युवा शेतकरी संदिप आणि योगेश रमेश घोटेकर यांच्या खेडलेझुंगे शिवारातील साडेतीन एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे.विहीरीतील जेमतेम पाण्यावर त्यांनी फळबाग जगवली आहे.दरम्यान वाढत्या उन्हापासून डाळिंबाची बागा संरक्षित करण्यासाठी आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून युवा शेतकरी संदिप आणि योगेश घोटेकर यांनी केलेल्या प्रयोगाची परिसरात चर्चा होत आहे.घोटेकर बंधुंनी बाजारपेठेतून संपूर्ण डाळिंब बागेला संरक्षित करण्यासाठी नेटची खरेदी केली व आपल्या साडेतीन एकर क्षेत्रातील बागेला नेटने आच्छादन पसरविले आहे.यामुळे वाढत्या उन्हापासून डाळिंबाचे फळ वाचण्यास मदत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.तसेच बाग वाचविण्यासाठी सुधारित पद्धतीच्या आच्छादनाचा वापर करता येत असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाची तीव्रता जास्त अधिक जाणवत आहे.सततचे वातावरण बदलामुळे डाळिंब बागेला धोका निर्माण झालेला आहे, या उन्हाच्या तडाख्यापासुन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या रोगराईपासुन संरक्षणासाठी डाळिंबाच्या बागेवर नेटचा वापर केलेला दिसत आहे. नेटच्या संरक्षणामुळे उन्हाचा डायरेक्ट परिणाम फळांवर आणि झाडांवर होणार नाही तसेच डाळिंब बागेवर येणारे रोग यांचा सुद्धा प्रसार कमी होतो.
डाळिंब बागांचे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी गरजेनुसार जुन्या साड्या,कापड याचा वापर करतात परंतु थोड्याश्या उनवाऱ्यामुळे साड्या कापडं फाटले जाते.त्यामुळे नवीन पद्धतीचा वापर करुन नेट च्या सहाय्याने डाळिंब बागेला अच्छादन देऊन फळबागा वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.यासाठी मोठा खर्च येत आहे.योग्य भाव मिळणे गरजेचे आहे.शेतकरी वर्ग आपले पीक वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतो मात्र त्याला शासनाने साथ देणे गरजेचे आहे.
दिलीप घोटेकर,डाळिंब उत्पादक,खेडलेझुंगे
वाढत्या उष्णतेमुळे डाळिंब झाडे ही तणावात आहेत तर वाढत्या उन्हामुळे आंबे बहरातील फळे ही तडकली जात आहेत.उन्हामुळे फळांवर चट्टे पडतात.यामुळे फळांचा दर्जाही ढासळतो तर काढणी योग्य तयार झालेले फळ टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.यामुळे फळबाग वाचविण्यासाठी नेहमीपेक्षा जास्तीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो आहे.
रमेश घोटेकर,डाळिंब उत्पादक,खेडलेझुंग
बाजारभाव असूनही उत्पादन अत्यल्प.
मागील दोन वर्षापासून डाळिंबाच्या बागांवर प्लेग,करपा, बुरशी,तेल्या आदींसह विविध रोग पडत असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत होता.गेल्या अनेक वर्षांपासून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.कधी अवकाळी, अतिवृष्टी,गारपीट तर कधी ढगाळ वातावरण यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…