लालपरी चा प्रवास महागणार
एसटीची हंगामी भाडेवाढ
नाशिक: प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या सुट्टीत लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर केला जातो, सामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी.त्यातही महिलांना पन्नास टक्के सवलत असल्याने लालपरी च्या प्रवासाला पसंती मिळत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्यांसाठी, देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करत असतात. उन्हाळी सुट्यांत अनेकजण गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात. त्यामुळे एसटीने उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय घेतला आहे. भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाकडून महसून वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते. दरम्यान याच भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी काळात बसच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उन्हाळी सुट्टयासाठी केलेली तिकीट दरवाढ हंगामी राहणार असून म्हणजेच, तिकीट दर वाढ केवळ एप्रिल ते 15 जूनपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार, असे सांगण्यात येते. तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवागनी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे.
नाशिक मधून इतक्या बसेस सोडणार
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विशेष गाड्या चालवल्या जातील.
गर्दीच्या मार्गांवर मध्यवर्ती कार्यालयातून 496 बसेस चालवण्यात येणार आहेत. मुंबई राज्यात 211, पुण्यात 332, छत्रपती संभाजीनगरमध्ये 249, नाशिकमध्ये
199, अमरावतीमध्ये 51 आणि नागपूर राज्यात 46 विशेष गाड्या धावत आहेत.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…