नाशिक

शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

योजनेची माहिती पोहचवण्यात अपयश

नाशिक : प्रतिनिधी

कोरोना काळात बंद पडलेली शेततळे योजना राज्य शासनाने पुन्हा सुरु केली आहे. शेतकऱ्यांसाठी वॉटर बॅक म्हणून समजली जाणारी शेततळे योजना कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने गुंडाळूली होती. ही योजना पुन्हा सुरु करावी, याकरिता मागील वर्षापासून पुन्हा ही योजना सुरु करण्यात आली. मात्र जिल्हयातील शेतकऱ्यांनी शेततळे योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ही योजना पुन्हा सुरु झाली आहे, ही माहिती शेतकऱ्यापर्यत पोचवण्यात कृषी विभागाला विभागाला अपयश आल्याचे बोलले जात आहे.
कृषी विभागाने नाशिक जिल्हयाकरिता 2022-23 या वर्षाकरिता 605 शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहेे. मात्र  शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे आकडेवरुन दिसत आहे. मुळात शेततळे योजना सुरु झाली, ही माहीतीच शेतकऱ्यांपर्य न गेल्यानेच अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी शेततळे योजनेसाठी जिल्हयातील पंधराही तालुक्यातून शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळ्त असे. मध्यंतरी कोरोनात शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान महाविकास आघाडीने बंद करुन टाकले. त्यावेळी शेतकाऱ्यांनी मोठा विरोध या निर्णयाला  करत तसेच ही योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी सर्वच स्तरावर सुरु होती. अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घेत ही योजना सुरु केली. विशेष म्हणजे आता या योजनेत दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करुन 50 वरुन 75 हजारापर्यत रक्कम वाढ करण्यात आली आहे. नाशिक जिल्हयाला 605 शेततळ्यांचे उदिष्ट दिल्यानंतर अवघे 369 अर्ज आले. त्यातुन आता 173 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. दरम्यान शेततळ्याचे उदिष्ट पूर्ण होत नाही तोवर ऑनलाइन अर्ज सुरुच ठेवले जाणार आहे. येवला, बागालाण, चांदवड व नांदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक अर्ज केले होते. 25 बाय 25 बाय 3, 30 बाय 25 बाय 3, 30 बाय 25 बाय 3, 30 बाय 30 बाय 3, 34 बाय 34 बाय 3 या पद्धतीने शेततळ्यांचे कामे केली जातात.

ऑनलाइन अर्ज घेणे सुरुच राहणार
शासनान 605 शेततळ्यांचे उदिष्ट दिले आहेत, त्यासाठी 369 जनांनी अऋज भरले. शेततळ्याचा फायदा घेण्यासााठी पुढच्या वर्षापर्यत अर्ज घेणे सुरुच ठेवले जाणार आहे. सध्या एक लॉटरी काढण्यात आली आहे. जयंत गायकवाड, विस्तार अधिकारी

लॉटरी निघालेल्या लाभार्थ्यांची संख्या
बागलाण – 26, चांदवड – 14, देवळा – 5, दिंडोरी – 9, इगतपुरी – 5, मालेगांव – 9, नांदगांव – 8, निफाड – 1, पेठ – 1, सिन्नर – 3, सुरगाणा – 1, त्र्यंबक- 3, येवला – 88

Ashvini Pande

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

11 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

11 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

11 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

11 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

11 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

12 hours ago