नाशिक

‘शक्तिपीठ’विरोधात बारा जिल्ह्यांत शेतकर्‍यांचे आंदोलन

कोल्हापूर :
नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी (दि. 1) राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांनी एल्गार पुकारला. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून सरकारला सज्जड इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. बारा जिल्ह्यांतून जाणार्‍या या शक्तिपीठ महामार्गासाठी 86,000 कोटींचा चुराडा होणार आहे. तर हजारो हेक्टर सुपीक जमीन बाधित होणार आहे. त्यातच शेतकर्‍यांना तुलनेत कमी मोबदला मिळणार असल्याने शेतकर्‍यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये रान पेटवले आहे.
सोमवारी कोल्हापूरसह बारा जिल्ह्यांत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीजवळ महामार्ग रोको आंदोलन
केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरला एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्यासाठी जाणार आहेत. त्यांना विठ्ठलाने सुबुद्धी द्यावी आणि शक्तिपीठ रद्द करावा, असे साकडे घालण्यासाठी राजू शेट्टी पंढरपूरला जाणार आहेत. सरकारने शक्तिपीठ महामार्ग हा प्रतिष्ठेचा विषय करू नये. शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असे समजू नये. ड्रोनद्वारे शेतजमिनीची मोजणी करण्यास कोणी आले तर गोफनद्वारे ड्रोन फोडू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
कोल्हापुरात सुरू असणार्‍या रास्ता रोको आंदोलनादरम्यान काही शेतकर्‍यांनी पंचगंगा नदीपात्रात उड्या मारण्याचाही प्रयत्न केला. सरकार हा शक्तिपीठ महामार्ग करून आमच्या जमिनी काढून घेऊन आमचे उपजीविकेचे साधनच नष्ट करत आहे. मग आम्ही जगू कशाला? असं म्हणत नदीपात्रात उड्या मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रोखले.

विधानसभेतही विरोध सुरू

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरसह राज्यभरात उद्रेक झाला. त्यातच विधानसभेत काही आमदारांनीही शक्तिपीठ महामार्गाबाबत तीव्र लढा उभारून हा मार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे म्हटले आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या लढाईसोबतच विधानसभेतही आमदारांकडून याला तीव्र विरोध होणार हे मात्र निश्चित आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

23 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

23 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

23 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

23 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

23 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

24 hours ago