शेतकर्यांना आता अल्पदरात जेवण; चहा-नाश्त्याचीही सुविधा उपलब्ध
सिन्नर : प्रतिनिधी
बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना स्वच्छ व माफक दरात भोजन मिळावे, यासाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात ‘शेतकरी खानावळ’ सुरू करण्यात आली आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दिवसभर बाजारात थांबणार्या शेतकर्यांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा देणारा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या खानावळीचे संचालन श्रीराम समर्थ महिला बचतगटामार्फत केले जाणार आहे. येथे शेतकरी, व्यापारी व बाजार समितीतील विविध घटकांना चहा, नाश्ता आणि भोजनाची सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे, संचालक शरद थोरात, गणेश घोलप, जालिंदर थोरात, सुनील चकोर, रवींद्र शेळके, शरद चतुर, नवनाथ नेहे, पिराजी पवार, ज्ञानेश्वर गाडे, शुभम वारुंगसे, कैलास वाजे, केशव कोकाटे आदी उपस्थित होते. तसेच व्यापारी बाळकृष्ण चकोर, बाबूशेठ लड्डा, दिलीप खिंवसरा यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापार्यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. बाजार समितीत येणार्या प्रत्येक शेतकर्याला कमी खर्चात भोजनाची सुविधा मिळावी, हा उपक्रम सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असे आवाहन सभापती श्रीकृष्ण घुमरे यांनी यावेळी केले.
‘Farmers’ restaurant’ inaugurated at Sinnar Market Committee