दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळेल

मंत्री दादा भुसे : ओला दुष्काळ मुद्दा शासनाकडे मांडू

नाशिक : प्रतिनधी
जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून शासनाकडे पाठवा. त्यावर त्वरित कार्यवाही करून दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम पडेल. याच दरम्यान ओला दुष्काळसंदर्भातील मागणीचा मुद्दाही आपण शासनाकडे मांडू, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 29) जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यात त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा सुरू असून बाधितांना मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा सुरू असून बाधितांना मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगितले.

भुसे यांचे आदेश

मंत्री दादा भुसे यांनी आदेश दिले की, बाधित कुटुंबांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलून वीज पुरवठा पूर्ववत करावा. पंचनामे तातडीने करून अहवाल सादर करावा. संभाव्य साथीचे आजार टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *