मनमाडला ट्रकचा भीषण अपघात अपघातात चालक गंभीर जखमी…

मनमाड(आमिन शेख) :- मनमाड शहरातील इंदुर पुणे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असुन येथे रोज अपघात होत आहेत आज शहरातील बेथेल चर्च समोर स्पीड ब्रेकरवर एक ट्रक दुसऱ्या ट्रकला मागून जाऊन आदळला यामुळे भीषण अपघात झाला हा अपघात इतका भिषण होता की ट्रकचा पुढील भागाचा अक्षरशः चुरा झाला यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला व त्यात अडकला नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असुन ट्रकचालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असुन याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असुन या महामार्गावर असलेले अतिक्रमण देखील काढून टाकण्यात यावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Fatal truck accident in Manmad, driver seriously injured in accident…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *