मनमाडला अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

मनमाड(आमिन शेख):- मनमाड शहरानजीक असलेल्या अनकवाडे शिवरात ​दिनांक २८-२-२०२६ रोजी पहाटे ४.०० च्या सुमारास मनमाड-अहिल्यानगर महामार्गावर
रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने नर बिबट्या मृत्यूमुखी पडला. सदरचा बिबट्या ६ ते ७ वर्ष वयाचा होता. मनमाड पोलीस रात्री पेट्रोलींग करीत असताना त्यांना अनकवाडे गावाजवळ रस्त्यावर बिबट्या मृत झालेला दिसला. त्यांनी ही बाब वनविभागाला दूरध्वनीद्वारे कळविली. राहुल घूगे (वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला) यांचे मार्गदर्शनाखाली जयप्रकाश के. शिरसाठ (वनपरिमंडळ अधिकारी, मनमाड), श्रीमती वंदना खरात (वनरक्षक), इरफान सैय्यद (वनसेवक), संजय गुंजाळ, सचिन साळे (वन कामगार) हे तात्काळ जागेवर पोहोचले. शासकीय कागदपत्र पूर्ण केल्यानंतर श्रीमती दिपाली खवसे (पशुवैद्यकीय अधिकारी) यांनी बिबट्याचे शवविच्छेदन करून अहवाल दिला. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी सदरच्या बिबट्या निफाड येथे वनविभागाचे रोपवाटिकेेत पाठविण्यात आला.
​यावेळी राहुल घूगे (वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला), जे. के. शिरसाठ (वनपाल), श्रीमती वंदना खरात (वनरक्षक), इरफान सैय्यद (वनसेवक), संजय गुंजाळ, सचिन साळे, मुनिल मुरुम (वाहनचालक) हे उपस्थित होते.​वनपरिक्षेत्र अधिकारी येवला व वनपरिमंडळ अधिकारी मनमाड हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे आता पून्हा एकदा बिबटया आपल्या शहराच्या नजीक आहेत हे समजून नागरीक भयभीत झाले आहेत.

Leopard dies after being hit by unknown vehicle in Manmad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *