नाशिक

पित्याची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या

दिघवद, काजीसांगवी परिसरात शोककळा

प्रज्ञा  दौलत हिरेे                              प्रज्वल  दौलत हिरेे 

चांदवड/दिघवद : प्रतिनिधी
चांदवड तालुक्यातील दिघवद शिवार आणि काजीसांगवी येथील इनाम वस्तीजवळ काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका 34 वर्षीय पित्याने आपल्या पोटच्या दोन निष्पाप मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारी (दि. 26) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दौलत रामभाऊ हिरे (वय 34), त्यांची मुलगी प्रज्ञा (वय 10) आणि मुलगा प्रज्वल (वय 4) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दौलत हिरेे ग्रामपंचायत कर्मचारी होते. बुधवारी सकाळी त्यांनी आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि रायपूर येथील स्कूबा डायव्हर्सच्या मदतीने तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. विहिरीतूनचिमुकल्या प्रज्ञा आणि प्रज्वल यांचे मृतदेह बाहेर काढताच उपस्थित ग्रामस्थांचा व नातेवाईकांचा आक्रोश अनावर झाला. हसत्या-खेळत्या वयात या मुलांचा असा अंत झाल्याने पाहणार्‍या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. दौलत हिरे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आर्थिक विवंचना किंवा घरगुती तणावातून ही आत्महत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून, चांदवड पोलीस तपास करत आहेत.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

7 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

7 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago