डिजिटल अरेस्टच्या नावाखाली बनाव; गुन्हा दाखल
मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील सोयगाव भागातील एका डॉक्टर महिलेस मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या प्रकरणात नाव अडकवल्याची भीती दाखवत ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून 42 लाखांंची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव येथील पाटीलवाडी परिसरात राहणार्या संबंधित महिला डॉक्टरला 9 ते 26 फेब्रुवारीदरम्यान मोबाइलवरून वारंवार संपर्क साधण्यात आला. सत्य, दिवेशकुमार पांडे, रणजीतकुमार सत्य आणि प्रेमकुमार गौतम अशी संशयितांची नावे आहे. त्यांनी स्वतःची ओळख तपास यंत्रणेतील अधिकारी अशी करून दिली. त्यांच्या बनावट सांगण्यावर विश्वास ठेवल्याने डॉक्टर महिलेला फसवणुकीला सामोरे जावे लागले.
याबाबत अधिक घटनाक्रम असा की, आरोपींनी ‘जेट एअरवेज’चे संचालक नरेश गोयल यांच्या आर्थिक घोटाळ्यात तुमचे नाव आल्याचे सांगितले. मुंबईतील कॅनरा बँकेत तुमच्या नावाने खाते उघडण्यात आले असून, त्यासोबत असलेले एटीएम कार्ड गोयल यांच्याकडे सापडल्याची बतावणी करण्यात आली. या खात्यात जमा झालेली दोन कोटी रुपयांची रक्कम विविध खात्यांमध्ये वर्ग झाली आहे. त्यातून तुम्हाला 25 लाख रुपयांचे कमिशन मिळाल्याचा खोटा आरोपही भामट्यांनी केला. याचबरोबर संशयितांनी डॉक्टर महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा बनाव करत व्हिडिओ कॉलवरून सतत नजर ठेवण्याचे नाटक केले. तसेच नातवंडांचे अपहरण करू आणि कुटुंबाला जीवे मारू, अशा धमक्या देत मानसिक दबाव टाकण्यात आला. या दहशतीमुळे घाबरलेल्या डॉक्टर महिलेने वेळोवेळी ऑनलाइन व्यवहार करून एकूण 42 लाख रुपये संशयितांच्या खात्यावर वर्ग केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिला डॉक्टरने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा मोबाइलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही. अशा प्रकारचे फोन किंवा संदेश आल्यास घाबरू नये आणि तत्काळ सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Female doctor cheated of Rs 42 lakhs
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…