उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट बंदोबस्त
नाशिक। प्रतिनिधी
लाेकसभा निवडणुकीसाठी उद्या (दि. २६) उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करता येणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अर्ज भरतेवेळी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आयुक्तालयाच्या परिमंडळ एककडून कडेकाेट बंदाेबस्त तैनात केला जाणार आहे. तसेच आवश्यक ठिकाणी बॅरेकेडिंग केली जात असून स्थानिक पाेलीसांसह एसआरपीएफ, आरसीपी आणि सीआयएसएफचा अतिरिक्त बंदाेबस्त कार्यरत असणार आहे. त्यामुळे कलेक्टर ऑफिसला पाेलीस छावणीचे स्वरुप प्राप्त हाेणार आहे.
लाेकसभा निवडवणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयाेगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आचारसंहिता लागू असून सर्वच मतदार संघात अपक्ष, सत्ताधारी व विराेधी पक्षात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. त्यानुसार जाहीर कार्यक्रमानुसार नाशिक आणि दिंडाेरी मतदार संघासाठी २६ एप्रिल ते ३ मे या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे जिल्हाधिकारी जलज शर्मा व इपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या कार्यालयात दाखल करावे लागणार आहेत. दरम्यान, सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार अर्ज भरण्यासाठी येतांना जबरदस्त शक्तिप्रदर्शन करणार आहे. स्टार प्रचारक, शेकडाे ते हजाराे कार्यकर्ते हजेर लावणार आहेत. त्यामुळे यावेळी काेणत्याही स्थितीत कुठेही अराजकता, वाद हाेऊ नये यासह झालाच तर ताे निवळण्यासाठी पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशाने परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व अधिकारी, अंमलदार बंदाेबस्ताची आखणी करत आहे. त्यानुसार, कलेक्टर ऑफिसच्या चारही बाजूला पाेलीसांची संशस्त्र बंदाेबस्त तैनात असणार आहे.
वाहतूक मार्गात बदल
सीबीएस ते मेहेर सिग्नल मार्गावर वाहतुक मार्ग बदलाचे नियाेजन केले जाणार असून दाेन्ही प्रवेशद्वारांवर सरकारवाडा पाेलीस, गुन्हेशाखा व एसआरपीएफ, हाेमगार्डचा बंदाेबस्त तैनात असेल. जिल्हाधिकारी कार्यालयातील दाेन्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर चाेख बंदाेबस्तासह थेट पाेलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व अंमलदार कार्यरत असतील.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…