अखेर बडगुजर, घोलप, मुर्तडक भाजपात दाखल, मुंबईत प्रवेश सोहळा

नाशिक: प्रतिनिधी

ठाकरे गटाने हकालपट्टी केल्यानंतर चर्चेत आलेले माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर नयना घोलप, अशोक मुर्तडक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज मुंबईत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यास प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाने उपनेते असलेल्या सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली होती. ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यादरम्यान त्यांच्या भाजपा प्रवेशाला स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता. बडगुजर यांचे सलीम कुत्त्त याच्याशी संबंध असल्याने प्रवेश देऊ नये, तसेच त्यांच्यावर इतर 17 गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या प्रवेशाला विरोध म्हणून नाशिक पश्चिम च्या आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी थेट मुंबई गाठत बावनकुळे तसेच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नाशिक दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी मात्र पक्ष वाढवण्यासाठी कुणी जर भाजपात येत असेल तर त्यांचे स्वागत केलं जाईल, असे म्हणत बडगुजर यांच्या प्रवेशाला एकप्रकारे हिरवा कंदिलच दाखवला होता, आज मुंबईत अनेक कार्यकर्ते घेऊन गेलेल्या बडगुजर यांना प्रवेश देण्यात आल्याने स्थानिक विरोधही आता काही दिवसात मावळ्यात जमा आहे, कारण भाजपच्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकारी यांना स्पष्ट सूचना देत पक्षाच्या शिस्तीला कुणीही गालबोट लावू नये असे सांगितले होते. आज मुंबईत बडगुजर यांचा प्रवेश सोहळा पार पडला तत्डपूर्वी ब डगुजर यांनी माध्यमांशी सवांद साधताना आपण भाजपला संपूर्ण महानगरात नंबर 1 चा पक्ष होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. मनसेच्या काळात महापौर पद भूषविलेलं अशोक मुर्तडक यांनीही आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, याशिवाय माजी मंत्री बबन घोलप यांच्यासह त्यांची कन्या नयना घोलप यांनी देखील प्रवेश केल्यानं शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे.

बावनकुळे आधी म्हणाले माहीत नाही नंतर मात्र हजर

सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाला अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अगोदर स्थानिक मंडळींचा विरोध, नंतर नाशिकला आलेल्या बावनकुळे यांनी दाखवलेल्या हिरव्या कंदील नंतरही स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा विरोध कायम राहिला. आज प्रवेशाचा दुपारचा मुहूर्त ठरलेला असताना दुपारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी असा काही प्रवेश सोहळा होत आहे हे आपल्याला माहीतच नसल्याचे सांगत बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत इन्कार केला होता परंतु नंतर मात्र प्रवेश सोहळ्याला ते हजर झाल्याने  सकाळी त्यांनी प्रवेशाबाबत माध्यमांशी बोलताना इन्कार का केला होता, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापालिका निवडणुकीत ताकद दाखवू

भाजपात प्रवेश करताच बडगुजर यांनी महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद दाखवून देऊ, निवडणुकीत दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असे सांगत आपण पक्ष सांगेन त्याप्रमाणे वाटचाल करू, असे सांगितले.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

11 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

11 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

11 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

11 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

12 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

12 hours ago