पंचवटी : प्रतिनिधी
पेठरोडवरील सप्तरंग स्टॉप येथील पानटपरीला रविवारी मध्यरात्री सुमारास आग लागली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र,पान टपरीमधील 70 ते 80 हजारांच्या मालाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेत आग नियंत्रणात आणली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश धोत्रे (वय 28, रा. राजमुद्रा सोसायटी, सप्तरंग पाठीमागे, पेठरोड) याची हॉटेल घुंगरूसमोर पोपटराव पिंगळेनगर कॉर्नरजवळ पानटपरी आहे. नित्यक्रमाने शनिवारी (दि.13) रोजी दहा वाजता कामकाज उरकून पानटपरी बंद करून घरी गेला. रविवारी (दि. 14) बारा ते साडेबाराच्या दरम्यान पानटपरीत अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग भडकली. काही क्षणातच आगीचे लोट वरच्या बाजूला धडधडू लागले. एका सुजाण नागरिकाने अग्निशमन दलाला माहिती कळवली असता, तत्काळ बंब क्रमांक 3309 घटनास्थळी पोहोचला.
काही वेळातच आग नियंत्रणात आणली. या आगीत पानटपरी जळून खाक झाली. जवळपास सत्तर ते ऐंशी हजारांचे नुकसान झाले आहे. ही कामगिरी लीडिंग फायरमन संदीप जाधव, बाळू लहानगे, वाहनचालक बाळू काकडे, ट्रेनी फायरमन नीलकंठ शिंदे, अजय पाटील आदींनी बजावली.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…