दि. 7 ते 13 सप्टेंबर 2025
पुरुषोत्तम नाईक
मेष : लाभ होतील
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती गुरू संमिश्र आहे. मंगळ प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहे. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. शेअरमध्ये लाभ होतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागतील. प्रकृती सांभाळा.
वृषभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. शेअरमध्ये लाभ होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. प्रकृती चांगली राहील.
मिथुन : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शनि, मंगळ प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. वाद टाळा, शेअर्समध्ये लाभ होतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा, राहत्या घराचे प्रश्न उद्भवतील. आरोग्य सांभाळा. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृध्दी प्राप्त होईल.
कर्क : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल अआहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आर्थिक दिलासा मिळेल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. खर्च वाढतील. शासकीय कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. प्रकृती प्रश्न सतावतील.
सिंह : कामे मार्गी लागतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू अनुकूल आहेत. रवी, शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शेअरमध्ये गुंतवणूक करणे टाळा. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे मार्गी लागतील. नोकरदारांना अडचणी येतील. व्यापारी, व्यावसायिकांनी मोठी जोखीम स्वीकारणे टाळा. आरोग्य प्र्रश्न त्रस्त करतील. काळजी घ्या.
कन्या : गणिते चुकतील
या सप्ताहात मंगळ, शुक्र, अनुकूल आहेत. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना कामाचे ओझे वहावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते चुकतील. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामांना विलंब होईल. प्रकृतीची काळजी घ्या.
तूळ : प्रवास टाळा
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि, मंगळ प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवासात अडचणी येतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदारांच्या व व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक : अचानक धनलाभ
या सप्ताहात शनि, मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी सतावतील. शासकीय कोर्ट केचरीची कामे लांबणीवर पडतील. आरोग्यप्रश्न त्रस्त करतील. अचानक धनलाभ होईल.
धनु : आनंदवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, राहू, केतू, गुरू अनुकूल आहेत. शनि, शुक्र प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यावसायिकांना आनंदवार्ता कळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मकर : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. मंगलवार्ता कळतील. नोकरदारांची प्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात विलंब होईल. आरोग्यप्रश्नांची नीट काळजी घ्या.
कुंभ : अडचणी सतावतील
या सप्ताहात बुध, गुरू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांना अडचणी सतावतील. मनस्वास्थ्य बिघडेल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. प्रकृती जपा.
मीन : खर्च वाढतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे अडचणीत सापडतील. व्यापारी, व्यावसायिकांना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरेल. आरोग्य चांगले राहील.
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…
अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…
कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…
नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…