लासलगाव : वार्ताहर
लासलगाव- कोटमगाव रोडवरील 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्रात सोमवारी (दि. 9) दुपारी आग लागल्याची घटना घडली. उपकेंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या व वाळलेल्या गवताला आग लागून ती वेगाने पसरली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच लासलगाव येथील सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाचा अग्निशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. या अग्निशामक दलाच्या सदस्यांनी व महावितरणच्या कर्मचार्यांनी तत्पर कार्यवाही करत आग आटोक्यात आणली, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीजपुरवठा खंडित केला होता. उपकेंद्र परिसरात सुमारे 1630 सोलर पॅनल बसविण्यात आले असून, या आगीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती.
लासलगाव येथील सिद्धवीर हनुमान मित्रमंडळाच्या अग्निशमन दलाच्या सदस्यांनी व महावितरणच्या कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न करून वेळीच आग विझविल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेत वीज वितरण कंपनीचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली.
Fire at electricity substation on Kotamgaon Road
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…