नाशिक

सिडकोतील फर्निचर कारखान्याला आग

सिडको : विशेष प्रतिनिधी

केवल पार्क परिसरातील हिंदुस्तान बेकरीच्या मागील बाजूस असलेल्या एका फर्निचर बनविणार्‍या कारखान्याला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखान्यातील फर्निचर, सोफे, प्लायवूड व इतर साहित्य जळून खाक झाले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
केवल पार्क परिसरात माधव प्लायवूड या नावाने फर्निचर निर्मितीचा कारखाना असून, येथे फर्निचर व सोफ्यांचे काम केले जाते. सायंकाळच्या सुमारास अचानक आगीच्या भडकलेल्या ज्वाळा दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर विभाग व अंबड एमआयडीसी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.आगीत कारखान्यातील महागडे फर्निचर, सोफे, प्लायवूड, रेग्झीनसह इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याचे कारखाना मालकाने सांगितले.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

23 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

23 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

23 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

23 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

23 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

24 hours ago