नाशिक

विंचूरलगत विष्णूनगरात मका गट्टू कंपनीला आग

विंचूर : प्रतिनिधी
विंचूरपासून जवळच असलेल्या विष्णूनगर येथील म्हसोबा माथा परिसरात मंगळवारी (दि.9) मध्यरात्री दीडच्या सुमारास मक्याच्या भुसापासून गट्टू तयार करणार्‍या कंपनीला आग लागली. त्यात तीन ते चार लाखांचेे नुकसान झाले.
पहाटे पाचच्या दरम्यान परिसरातील नागरिकांना कंपनीच्या दिशेने प्रचंड धूर निघत असल्याचे दिसल्याने ही घटना उघडकीस आली. नागरिकांनी तत्काळ कंपनी व्यवस्थापकांंना फोन करून माहिती दिली. त्यानंतर व्यवस्थापकांनी कंपनीमालक डॉ. सचिन जेऊघाले यांच्याशी संपर्क साधला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. जेऊघाले यांनी त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क साधला.त्यानंतर चांदवड व निफाड येथील दोन अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रित आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग इतर यंत्रसामग्री व परिसरात न पसरता आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेत कंपनीमध्ये साठवून ठेवलेला 70 ते 80 टन मक्याचा भुसा जळून खाक झाला. प्राथमिक अंदाजानुसार तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

12 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

12 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago