सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील पांगरी येथे विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे शेतकर्याच्या शेतातील मका व चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पांगरी-धारणगाव रस्त्यालगत सोमनाथ बाजीराव निरगुडे यांची वस्ती असून, त्यांनी शेतात मका पीक घेतले होते. पीक काढणीनंतर शेतातील खळ्यात पाच ते सहा ट्रॅक्टर चारा तसेच त्याशेजारी तीन ते चार ट्रॅक्टर मक्याच्या बिट्ट्या साठवून ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी दुपारी शेतातून जाणार्या विजेच्या तारांमध्ये पक्ष्यांमुळे घर्षण होऊन ठिणग्या खाली पडल्या आणि गवताला आग लागली. ही आग वेगाने पसरत चारा व मक्याच्या बिट्ट्यांपर्यंत पोहोचली.
घटनेच्या वेळी शेतात कोणीही नसल्याने नुकसान वाढले. रस्त्याने जाणार्या नागरिकांच्या लक्षात आग येताच त्यांनी तात्काळ निरगुडे यांना माहिती दिली. त्यानंतर रस्त्याच्या कामावर असलेला टँकर व जेसीबीच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. परिसरातील शेतकर्यांनीही धाव घेत काही प्रमाणात बिट्ट्या वाचवण्यात यश मिळवले.
दरम्यान, सिन्नर नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत निरगुडे यांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Fire breaks out in maize and fodder fields in Pangri; Loss of Rs. 1.25 lakh
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…