नाशिक

मर्‍हळची खंडोबा यात्रा : पिवळ्या भंडार्‍यात न्हालं गाव

पालखी मिरवणुकीत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या नादात भक्तीची लय

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील मर्‍हळ मध्यरात्रीचे तीन वाजले होते आणि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने संपूर्ण गाव जागे झाले होते. पांगरीहून आलेल्या मानाच्या रथासोबत सजवलेली पालखी महाल बागेकडे निघाली. तीन क्विंटल भंडार्‍याच्या उधळणीने गाव पिवळ्या श्रद्धेने न्हालं होतं. शेतकरी, कामगार, लहान, थोर खंडोबाच्या भक्तीत तल्लीन झाले होते.
मर्‍हळची ही चार दिवसांची यात्रा फक्त उत्सव नाही, तर गावाची ओळख आहे. परिसरातील आठ ते दहा गावांचे कुलदैवत असलेला खंडोबा महाराज येथे दरवर्षी लाखो भाविकांचे दर्शन घेतो. सोमवारी (दि.2) रात्री 12 वाजता मानाचा रथ मंदिरात दाखल झाला आणि मध्यरात्री देवाला पालखीत विराजमान करून भव्य मिरवणूक सुरू झाली. रात्री 3 वाजता पालखी महाल बागेत पोहोचली. मुंबई येथील जय मल्हार मित्रमंडळाच्या आतषबाजीने उत्सवाला वैभव वाढवला.
मंगळवार(दि.3)पासून गुरुवारपर्यंत यात्रोत्सव रंगणार आहे. मंगळवारी दुपारी बैलगाडा शर्यतींनी शेतकर्‍यांच्या ताकदीचा जल्लोष पाहायला मिळाला, तर रात्री पांडुरंग मुळे आणि तमाशा पार्टीने पारंपरिक लोककलेचा ठेका धरला. बुधवारी कुस्तीची दंगल होणार आहे आणि रात्री पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या तमाशा मंडळाने भाविकांना मंत्रमुग्ध केले जाणार आहे. चार दिवसांची ही यात्रा संपेल. भंडार्‍याचा रंग हळूहळू फिका होईल, पण ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा नाद, खंडोबावरची श्रद्धा आणि मर्‍हळकरांची भक्ती वर्षभर मनात घर करून राहणार आहे.

यात्रेत भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
लोकवर्गणीतून 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यापैकी 12 गावात, तर 8 यात्रा स्थळ परिसरात कायमस्वरूपी कार्यरत राहणार आहेत. यात्रेनंतर हे कॅमेरे खंडोबा मंदिरात बसवले जातील.

Marhal’s Khandoba Yatra: A village bathed in yellow

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago