म्हसोबावाडीत शॉर्ट सर्किटमुळे आग

एक घर जळून खाक तर शेजारच्या तीन घरांचे नुकसान
  पंचवटी : वार्ताहर
म्हसरूळ  शिवारातील म्हसोबावाडीत शॉर्ट सर्किटमुळे बुधवार (ता.२५) रोजी  सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली.  या आगीत एका कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला असून शेजारच्या तीन घराचे देखील नुकसान झाले आहे. आग विझवण्यात स्थानिकसह अग्निशामक दलास यश मिळाले असून मोठा अनर्थ टळला .
   प्रभाग क्रमांक एक मधील म्हसरूळ शिवारात म्हसोबा वाडी असून या ठिकाणी जवळपास तीनशे ते पाचशे कुटुंब वास्तव्य करतात. या भागातील शेवटच्या गल्लीत बत्तीस वर्षीय विकास प्रकाश खरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्याचे कुटुंबात आई,  बायको रमा, तीन मुले असे सर्व सदस्य आहेत. सकाळी अकरा वाजेच्यां दरम्यान,  त्याचे राहते घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली . घराच्या आगीचा दाह वाढला अन् बाजूच्या तीन घरांना देखील त्याची झळ बसली. यावेळी आजू बाजूच्या नागरिकांनी घरातील भरून ठेवलेले सर्व पात्राचे पाणी टाकून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.  काही सुजाण नागरिकांनी अग्निशामक दल व स्थानिक गॅस एजन्सीला खबर केली. महाले गॅसचे दोन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले त्या तीन घरांमधील गॅसच्या टाक्या सुरक्षित ठिकाणी हलविल्या . अग्निशामक दलाचा एक बंब पाचारण करण्यात आले होते, फायरमन संजय कानडे, नितीन म्हस्के, मंगेश पिंपळे, मनोहर गायकवाड, वाहनचालक बाळासाहेब काकडे होते. आग नियंत्रणात आणली असून मोठा अनर्थ टळला आहे.
“हे नागरीक ठरले तारणहार”
एरवी आजूबाजूला घटना घडली की मोबाईल धारक मंडळी मदत करण्याऐवजी फोटो व  व्हिडिओ काढतात.  परंतु म्हसोबावाडी मध्ये आग लागली त्यावेळी एकानेही फोटो व व्हिडिओ न काढता आजूबाजूच्या नागरिकांनी घरात पिण्यासाठी वापरण्यासाठी भरलेले पाणी घेऊन आग लागलेल्या ठिकाणी धाव घेत. आग विझवण्याचा प्रयत्न केला. या मदत कार्यात सामाजिक कार्यकर्ता हिरामण गायकवाड, दिपक गोरडे, आतम पौल, रविंद  तोडके,  प्रकाश  खरात, मिसाळ ताई, स्वप्नील गायकवाड, यश पवार  अंकुश धोंगडे, गौरव मोरे, बेंडकळे ताई, रुक्मिणी गायकवाड, बन ताई आदी पुरुष व महिला असे स्थानिक अग्रेसर राहिले. या सर्वामुळेच मोठा अनर्थ टळला असून ते तारणहार ठरले आहेत.
    ” महाले गॅस एजन्सीची तत्परता”
म्हसरूळ भागात मिलिंद महाले यांच्या महाले गॅस एजन्सी चे कार्यालय आहे. म्हसोबावाडीत आग लागली याबाबत एका सुजाण नागरिकांनी त्यांना संपर्क केला, एजन्सी मालक मिलिंद महाले यांनी हा ग्राहक कुठल्या एजन्सीचा आहे हे न बघता तात्काळ दोन कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाठवले . सदर कर्मचाऱ्यांनी स्थानिकांची मदत घेत, त्या आग लागलेल्या घरातील सिलेंडर बाहेर काढले व तपासणी करत ताब्यात घेतले. त्यातील एका सिलेंडरचे सिल जळाल्याचे निदर्शनास आले. यावर सदर सिलेंडर जमा करत नवीन वितरित करण्याचा निर्णय घेतला.
Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago