लेडीज टेलर दुकानाला आग
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
नाशिक प्रतिनिधी
नवीन नासिक सिहस्थ नगर येथील संजय राका चौकात हेतल लेडीज टेलर या दुकानाला (दि ७)पहाटे पावणे पाच च्या दरम्यान आग लागली. नवीन नाशिक सिडको या वसाहतीतील रोडवर असलेले हे दुकान नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रसंगावधान राखून तात्काळ विझवण्यात आली.
आगीत ग्राहकांचे शिवण्यासाठी दिलेले कपडे आणी रेडीमेड कपडे तसेच दुकानातील इतर साहित्य जळून खाक झाले.इस्त्री चे बटन सुरू राहिल्याने शॉक सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे पहाटे साडेपाचच्या दरम्यान नागरिकांची वर्दळ सुरू असताना शेजाऱ्यांनी संबंधित दुकान मालकाला फोन करून आगीची सूचना दिली. त्यानंतर तात्काळ पोलिस आणि अग्निशामक दलाला पाचारण केले
नागरिकांनी घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतेही जीवित हानी झाली नाही. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टाळला.
नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…
नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…
चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…
पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको : विशेष प्रतिनिधी सरकार…
लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे…
अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…