नाशिक

अग्निशमन भरती: हजारो उमेदवारांवर अन्याय, नाशिकमधील कोर्स वगळला

नाशिक: प्रतिनिधी

नाशिक महापालिकेत मोठी अग्निशमन भरती होत आहे. एकूण 365 पदांसाठी ही नोकरभरती आहे. मात्र ही भरती आतापासूनच वादात सापडली आहे. अग्निशमन भरतीसाठी विशिष्ट प्रशिक्षण आवश्यक आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे प्रशिक्षण पूर्ण करणारेच पात्र ठरतील. यामुळे नाशिकमधील हजारो उमेदवार वंचित राहण्याची भीती आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्यांना वगळले आहे. शासनाने या अटीत बदल करावा, अशी मागणी होत आहे.

अग्निशमन भरती: अखिल भारतीय संस्थेच्या उमेदवारांवर अन्याय

महापालिका प्रशासनाने यावर राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्यांना संधी द्यावी. अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. मात्र, शासनाकडून याबाबत अजून अंमलबजावणी नाही. अग्निशमन भरती साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 डिसेंबर आहे. त्यापूर्वी बदल न झाल्यास उमेदवारांवर अन्याय होईल. राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने 2002 मध्येच या संस्थेला मान्यता दिली आहे. नाशिक महापालिकेने ठराव करून त्यास मंजुरी दिली होती.

नंतर हा ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला गेला. तिथेही त्याला मंजुरी मिळाली होती. मात्र, राजपत्र काढले तेव्हा संस्थेचे नाव वगळले गेले. याप्रकरणी संस्थेकडून दीड वर्षापासून पत्रव्यवहार सुरू आहे. महापालिका प्रशासनाकडेही पाठपुरावा झाला आहे. शासनाने नाशिकमधील 246 पदांच्या भरतीची जाहिरात दिली. यासाठी फक्त महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील प्रशिक्षित अर्ज करू शकतात. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र संताप आहे.

अग्निशमन विभागात काम करण्यासाठी जे प्रशिक्षण आवश्यक आहे, ते आम्ही पूर्ण केले आहे. मात्र, या भरतीत शासनाने केवळ महाराष्ट्र अग्निशमन सेवेतून प्रशिक्षण घेणारेच अर्ज करू शकतात, ही अट टाकली आहे. मात्र, यात आमची चूक काय? फी भरून आम्ही प्रशिक्षण घेतले असून, शासनाने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतून प्रशिक्षण करणार्‍यांनाही न्याय द्यावा. – एक उमेदवार

अग्निशमन विभागाच्या पदांसाठीची भरती जाहिरात
महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. यातील अग्निशमन
प्रशिक्षणाबाबतच्या अटीत बदल करावा याकरिता शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
– लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त (प्रशासन), मनपा

अभियांत्रिकी भरतीतही अनुभवाची अट

अग्निशमन विभागाच्या भरतीपूर्वी तांत्रिक (अभियांत्रिकी) संवर्गातील 140 पदांची जाहिरात आली. या भरतीतही विशिष्ट अनुभवाची अट आहे. तीन ते पाच वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. यामुळे तरुण आक्रमक झाले आहेत. त्यांनी खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सीमा हिरे यांच्याकडे प्रश्न मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल केला. खा. वाजे यांनी भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली.

प्रशिक्षण घेऊनही संधी नाही?

या संस्थेचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे. राज्यात कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक येथे प्रशिक्षण दिले जाते. असे असूनही अग्निशमन भरतीतून वगळले आहे. तरुणांनी ऐंशी हजार रुपये फी भरली आहे. तरीही त्यांना भरतीपासून वंचित राहावे लागत आहे. यात दोष कोणाचा, असा सवाल तरुण करत आहेत. आम्हालाही भरतीत संधी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. प्रशासन यावर काय तोडगा काढेल, याकडे लक्ष लागले आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

16 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

20 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

20 hours ago