नाशिक

नाशिकरोडला पूर्ववैमनस्यातून गोळीबार; एकाचा मृत्यू

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
येथील अत्यंत गजबजलेल्या जुन्या बिटको रुग्णालयाच्या परिसरात रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सुमित पगारे नावाचा युवक गंभीर जखमी झाला. सुमितला प्रथम जयराम हॉस्पिटल व त्यानंतर अशोका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थ करूनही त्याचा जीव वाचू शकला नाही.
तीन वर्षीय मुलीसाठी छोटी गाडी घेण्यासाठी घराबाहेर पडलेला सुमित हल्लेखोरांच्या गोळीबारात जीव गमावून बसला. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या बिटको रुग्णालयाजवळ सुमित पगारे याचे ऑफिस आहे. मित्रांसह सुमित बसलेला असताना तो मुलीसाठी खेळणी घ्यायला बाहेर पडला. तेव्हा काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या टोळक्याने त्यास थांबवून आपल्याला बोलायचे, असू सांगून बाजूला नेले. सुमितला काही कळण्याअगोदरच पोटाला पिस्तूल लावून दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर वाहनातून पसार झाले. दोन गोळ्यांपैकी एक आरपार गेली तर एक दुसरी शरीरातच अडकली. रक्तबंबाळ झालेल्या सुमित यास परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या जयराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर प्रकृती अत्यवस्थ असल्याने अशोका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अखेर सुमितचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बायको व मुलगी आहे. भररस्त्यावर झालेल्या या गोळीबारामुळे नाशिकरोड परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त अद्विता शिंदे, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत सपकाळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे बोलले जात आहे. संशयितांचा माग काढण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.

Firing at Nashik Road due to past enmity; one dead.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago