आधी तिच्यावर केले प्रेम
अन नंतर त्याने केले असे काही…..
नेमके काय घडले?
सिन्नर : प्रतिनिधी
माळेगाव येथील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत एकाच ठिकाणी कामावर असलेल्या विधवा महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तीचा खून केल्यानंतर संशयिताने गोंदे येथे येऊन शेतात कडुनिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिन्नरला घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रेम संबंधातून हा प्रकार घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शिल्पा अमोल पवार (२८) रा. मापारवाडी, असे मयत महिलेचे नाव आहे. तर महेंद्र सखाहरी रणशेवरे (४८) रा. गोंदे, ता. सिन्नर असे आत्महत्या केलेल्या पुरुषाचे नाव आहे. दोघेही माळेगाव औद्योगिक वसाहती मधील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामावर होते. सदर महिला ही माळी काम करत होती तर रणशेवरे तेथे सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. सदर महिलेला १० आणि ८ वर्षांची दोन मुले आहेत. तर रणशेवरे यांनाही एक मुलगा, मुलगी आहे. दोघांमध्ये प्रेम संबंध असल्याची चर्चा आहे. रविवारी (दि.२०) दोघेही कंपनीत कामावर होते. सुरक्षारक्षक कॅबिनच्या शेजारी असलेल्या इलेक्ट्रिक केबिनच्या पाठीमागे निर्जनस्थळी हे दोघेही रविवारी सकाळी ९ वाजता सोबत जाताना सीसीटीव्हीत कैद झाले. या कॅबिनच्या पाठीमागच्या बाजूला सीसीटीव्ही नसल्याची संधी साधून रणशेवरे याने शिल्पा पवार हिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यानंतर कंपनीतून गेट पास न घेताच सुरक्षा भिंतीवरून उडी मारून तो घरी आला आणि गोंदे येथे त्याने श्रीधर रणशवरे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, सोमवारी (दि.२१) सकाळी कंपनीतील काही कामगार कामानिमित्त इलेक्ट्रिक केबिनच्या पाठीमागे गेले असता तेथे महिलेचा मृतदेह पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.
हे दोघेही हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीतील इलेक्ट्रिक केबिनकडे जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे. त्यामुळे रणशवरे यानेच सदर महिलेचा खून केला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. यासंदर्भात मयत शिल्पा पवार हिचा दीर गुलाब लक्ष्मण पवार (३०) याने मुसळगाव एमआयडीसी पोलिसात अज्ञात व्यक्तीने आपल्या वहिनीचा धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवडकर करत आहे.
—
श्वानाने काढला मुख्य रस्त्यापर्यंत माग
हिंदुस्तान युनिलिव्हर कारखान्यात महिलेचा खून झाल्याची माहिती सोमवारी सकाळी मिळाल्यानंतर मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्राचारण करण्यात आलेल्या श्वानाने इलेक्ट्रिक केबिनच्या पाठीमागून मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला. त्यामुळे तेथून संशयित दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने फरार झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद
महेंद्र रणशवरे याने गोंदे येथील श्रीधर रणशेवरे यांच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन रविवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. या संदर्भात सुभाष रणशेवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वावी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गळफास घेतलेल्या ठिकाणी पोलिसांना दारूची बाटली आढळून आली.
—-
नादच खुळा: 9 नंबर साठी पठ्ठयाने मोजले इतके लाख पंचवटी :…
गरिबांचा कैवारी प्रेषित येशू ख्रिस्ताला सुळावर दिल्याचा शुक्रवार हा दिवस एक दु:खद दिवस मानला जातो.…
कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…
केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…