नाशिक

पहिणे बारी नजीक स्कूल व्हॅन पल्सर मोटर सायकलचा भीषण अपघात

तीन गंभीर जखमी, चिमुकले विद्यार्थी सुदैवाने सुखरूप

नाशिक : प्रतिनिधी
त्रंबकेश्वर जवळील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या पहिने बारीच्या आधी पेगलवाडी शिवारात स्कूल व्हॅन क्रमांक MH 15 DS 6737 आणि पल्सर मोटर सायकल क्र. MH 15 JF 2660 यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात शालेय विद्यार्थी किरकोळ तर अन्य तिघे जबर जखमी झाले आहेत . यात पल्सर या दुचाकी वाहनावरील जखमींचा समावेश आहे. चिखलवाडी येथील सर्वहारा इंग्लीश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला हा अपघात झाला. अपघातातील जखमींना त्रंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वरील सर्व जखमींवर त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉ. लोंढे व डॉ. राहुल येवले व सहकाऱ्यांनी यांनी उपचार केले.तर दिलीप वारघडे , वय ४६ , संदीप मेरांदे वय २५ व रमेश आचारी वय २५ हे तिघे गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचारासाठी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी आरोग्यदूत यांनी या अपघाताची माहिती तात्काळ त्रंबकेश्वर पोलिस ठाण्याला कळवली त्यानंतर त्रंबकेश्वर पोलिसांनी क्षणाचीही उसंत न घेता घटनास्थळी धाव घेत रुग्णावाहिकेतून तर काही जखमीना तुषार जगताप यांच्या गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा अपघात दुचाकी स्वारांचे भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.दरम्यान गंभीर जखमी असलेला चालक या धक्यातून सावरल्यानंतर त्याच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती त्रंबकेश्वर पोलिसांनी दिली.

“स्कुल व्हॅन पहिन्याकडून त्रंबकेश्वरकडे जात असतांना समोरून भरधाव येणारी दुचाकीने जम्प घेऊन थेट व्हॅन चालकाच्या केबिनवर जाऊन आदळली. यावेळी व्हॅन मध्ये लहान लहान विद्यार्थी होते. अचानक झालेल्या या हादस्याने ती भेदरली. चालकाने व्हॅन त्याही परिस्थितीत वाहनावर नियंत्रण ठेवून पुढील अनर्थ टाळला. यात चिमुकले किरकोळ जखमी झाले. सुदैवाने त्यांना गंभीर इजा झाली नाही. त्रंबकेश्वर पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी देखील तातडीने घटनास्थळी येऊन वेळीच सहकार्य केल्याने जखमींना रुग्णालयात दाखल करून वेळीच उपचार मिळण्यास मदत झाली.”

Ashvini Pande

Recent Posts

पंचवटीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई

अंमली पदार्थ विकणार्‍यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…

1 hour ago

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

2 days ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

2 days ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

2 days ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

2 days ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

2 days ago