सीएनजी गॅसचा मुबलक पुरवठा करून दर निश्चिती करा – राजेंद्र फड

 

सीएनजी गॅसच्या मुबलक पुरवठा व दराबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनकडून केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन

नाशिक:प्रतिनिधी  सीएनजी गॅसचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासोबत दर निश्चिती करण्यात यावेत अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनच्या वतीने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनद्वारे केली.

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिशनकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात वाढते प्रदूषण लक्षात घेता केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार सीएनजी वाहनांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूकदारांना शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. वाहतूकदार देखील त्याला चांगला प्रतिसाद देत असून अनेकांनी सीएनजी वाहने खरेदी केलेली असून ट्रान्सपोर्ट व्यावसायासाठी मोठ्या प्रमाणात या वाहनांचा वापर वाढविला असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, शासनाच्या या धोरणाला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून चागला प्रतिसाद मिळत आहे. मात्र सीएनजी गॅस बाबत नसलेली दर निश्चिती व पुरेसा पुरवठा, डिझेल बरोबरीत वाढणारे दर, वेगवेगळ्या शहरात असलेले वेगवेगळे दर आणि गॅसचा तुटवडा यामुळे शासनाच्या धोरणालाच हरताळ फासला जात आहे. यामुळे गुंतवणूक करणारे व्यावसायिक अडचणीत येत असून ट्रान्सपोर्ट धारक अडचणीत सापडले असून शासनाने आपल्या धोरणानुसार सीएनजी दराबाबत नियत्रंण आणावे, दरात कपात करावी तसेच सर्व शहरात मुबलक गॅस एकाच किंमतीत उपलब्ध होण्यासाठी दर निश्चिती करण्यात यावी अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनच्या वतीने करण्यात आलेली आहे.

Ashvini Pande

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

15 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

17 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

1 day ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

1 day ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 days ago