भेसळयुक्त पदार्थ विक्रीविरूद्ध मोहीम

सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची मोहीम

नाशिक : प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सणांच्या काळात भेसळयुक्त मिठाई सह इतर खाद्यपदार्थाची विक्री होऊ नये म्हणून विविध मोहिम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार आता अन्न प्रशासनाच्या वतीने खाद्य पदार्थ  खरेदी करताना  विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सणाच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकीन ई. अन्नपदार्थाना मोठया प्रमाणात मागणी असते. या काळात दुध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मिठाई इ. अन्न पदार्थामध्ये भेसळ होण्याची तसेच कमी दर्जाचे अन्न पदार्थ उत्पादन व विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या व नमुने विश्लेषणासाठी घेण्याची विशेष मोहिम हाती घेतलेली आहे. प्रशासनातर्फे ग्राहकांना सुरक्षीत व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत. प्रशासनातर्फे ग्राहकांना अन्न पदार्थ खरेदी करतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मिठाई, दुध व दुग्धजन्य व इतर अन्नपदार्थ खरेदी करतांना फक्त नोंदणी किंवा परवानाधारक आस्थापनाकडुन खरेदी करावे. मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावे. खरेदी करतांना वापर योग्य दिनांक (Use by date) पाहुनच खरेदी करावी. उघडयावरील अन्नपदार्थांची खरेदी करु नये. माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासाच्या आत करावे, तसेच साठवणूक योग्य तापमानाला फ्रिजमध्ये करावी. मिठाईवर बुरशी आढळल्यास तसेच चव व वासामध्ये फरक जाणवल्यास ती मिठाई सेवन करु नये.

ग्राहकांनी अधिक माहिती व तक्रारी करण्यासाठी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करण्याचे आवाहन अन्न  प्रशासनाचे सह आयुक्त गणेश परळीकर यांनी केले आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago